धक्कादायक! नाशिक शहरात चार जणांनी संपविले जीवन
Breaking News: तिघा जणांनी गळफास घेऊन तर एकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
नाशिक : शहरासह जिल्ह्यात आत्महत्येच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. आता शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांनी आत्महत्या करून आपली जीवन संपवोले आहे.
तिघांनी गळफास घेतला आहे. तर एकाने विषारी औषध सेवन केले आहे. नाशिकच्या इंदिरानगर, नांदूर गाव, म्हसरूळ आणि अंबड औद्योगिक वसाहतीत या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
छताच्या लोखंडी कडीला दोरी बांधून गळफास
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. हार्दिककुमार जीवराभाई दसलानिया (३६) यांनी श्रीरामचंद्र सोसायटीसमोरील बांधकाम साइटवर छताच्या लोखंडी कडीला दोरी बांधून गळफास घेतला. त्यांचे भाऊ जितेशकुमार दसलानिया यांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विषारी औषध सेवन करून संपवले जीवन
अंबड औद्योगिक वसाहतीत घडली आहे. प्रकाश तुळशीराम गजभिये (54) यांनी घरी असताना विषारी औषध सेवन केले. त्यांचा मुलगा विशाल गजभिये याने त्यांना पाथर्डी फाटा परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पंख्यास दोरी बांधून घेतला गळफास
इंदिरानगर परिसरात घडली आहे. दत्ताराम जगन्नाथ केकाण (42) यांनी गुरुवारी राहत्या घरात हाताच्या नसा कापून घेत पंख्यास दोरी बांधून गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच त्यांचे भाऊ कृष्णा केकाण यांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले केले. मात्र डॉक्टरांनी दत्ताराम केकाण यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पंख्याला साडी बांधून घेतला गळफास
नांदूर गावात घडली आहे. सचिन बाळासाहेब बोराडे (31) यांनी सकाळी घरातील पंख्याच्या हुकास साडी बांधून गळफास घेतला. त्यांचे भाऊ नितीन बोराडे यांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Three persons committed suicide by hanging themselves and one by taking poison
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study