Home Suicide News अकोले ब्रेकिंग: जंगलात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

अकोले ब्रेकिंग: जंगलात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

Breaking News | Akole: सागवानाच्या झाडाला १६ वर्षीय  तरुणाने कमरेच्या कापडी पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Youth committed suicide by hanging himself in the forest

अकोले:  अकोले तालुक्यातील बेलापूर गावाच्या पश्चिमेकडील जंगलात सागवानाच्या झाडाला १६ वर्षीय  तरुणाने कमरेच्या कापडी पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना  बुधवारी (दि. १७) दुपारच्या  सुमारास उघडकीस आली. रोहन बाळासाहेब हिंदोळे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

रोहन हिंदोळे हा आपल्या आईसोबत बेलापूर येथे राहत होता. मंगळवारी रात्री ११च्या सुमारास मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी बाहेर जातो, म्हणून त्याने घर सोडले. तो न दुसऱ्या दिवशी सकाळीही घरी क परतला नाही.

नातेवाईक यांनी  कुंभाडी डोंगर परिसरात शोध घेतला असता जंगलातील सागाच्या झाडाला त्याने कापडी पट्ट्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. या धक्कादायक  घटनेने नातेवाईक हादरून गेले. या घटनेबाबत बेलापूर गावचे पोलिस पाटील केशव त्रिभुवन यांनी अकोले पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिस किशोर तळपे, पोलिस गोरे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

Web Title: Youth committed suicide by hanging himself in the forest

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here