अहमदनगर ब्रेकिंग! अत्याचार करून शाळकरी मुलीचा खून
Breaking News | Ahmednagar Murder: मुलीचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला.
नगर : देहरे (ता. नगर) येथील शाळकरी मुलीला शनिवारी (दि.१३) पळवून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करून मारहाण केली. त्यानंतर विहिरीत ढकलून दिले. ही घटना मंगळवारी उघडकीस आली असून, याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीसह दोघां- विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. देहरे गावात तणावपूर्ण शांतात झाली आहे.
गोट्या ऊर्फ ऋत्वीक संजय जाधव असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या मामाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत पीडित मुलीला शनिवारी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने एमआयडीसी पोलिसांत दिली होती. दरम्यान, पीडित मुलीचा मृतदेह मंगळवारी दुपारी देहरे येथील एका विहिरीत आढळून आला. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, त्यांनी नातेवाईकांनाही माहिती दिली. तिच्या अंगावर जखमा असल्याने मारहाण करून पीडित मुलीचा खून झाल्याचे उघड झाले.
नातेवाईकाने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, संशयित आरोपी गोट्या उर्फ ऋत्वीक संजय जाधव याचे दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. आरोपी ऋत्वीक जाधव हा मयत मुलीसोबतही बोलत होता. ही बाब त्या अल्पवयीन मुलीला खटकली. त्यानंतर अल्पवयीन मुलीने मयत मुलीला मारहाण करून तिला जाधव वस्तीकडे नेले. तिथे त्या अल्पवयीन मुलीने आरोपी गोट्या उर्फ ऋत्वीक जाधव याच्या मदतीने मयत मुलीच्या डोक्यात हत्याराने मारहाण करून विहिरीत ढकलून देत तिचा खून केला. आरोपी गोट्याने तिच्यासोबत अतिप्रसंग केला केला. पोलिसांनी अत्याचार, पोक्सो, खून असे वाढीव कलम लावले. दरम्यान, पोलिसांनी आरोपी गोट्या उर्फ ऋत्वीक जाधव याच्यासह त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. आरोपी जाधव याला न्यायालयात हजर केले असता त्याला २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. तर, अल्पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक हंडाळ यांनी दिली.
Web Title: Murder of a school girl by abused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study