संगमनेर तालुक्यात चायना मांजाची विक्री, गुन्हा दाखल
Breaking News | Sangamner: चायना बनावटीच्या मांजाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कडक कारवाई.
संगमनेर: राज्यभरात चायनीज मांजाने अनेकांचे बळी घेतले होते, या मांजामुळे पशुपक्षी व मानवाला गंभीर इजा होऊन जीव जात असल्याने गृह विभागाकडून कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजा विक्री व वापरावर बंदी करण्यात आली आहे. असे असताना देखील सर्रासपणे मांजा विक्री केला जातो. अशा चायना बनावटीच्या मांजाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कडक कारवाई केली आहे. संगमनेर तालुक्यात बेकायदेशीर चायना मांजा विक्री करताना आढळल्याने पोलिसांनी येथील एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चायना मांजा विकणे, तो जवळ बाळगणे. त्याची विक्री करणे यावर बंदी असतांनाही तळेगाव दिघे येथील शकील लतीफ आत्तार हा चायना मांजा विकत होता. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी काल रविवारी (दि. १४) कारवाई केली. पोलिसांनी याच्याकडून चायना मांजाचे ६०० रुपये किमतीचे ६ रिळ हस्तगत केले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Sale of china manja in Sangamner taluka Crime Filed
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News