अहमदनगर: महिलेला लिप्ट दिली अन घडला धक्कादायक प्रकार
Breaking News | Ahmednagar: ‘पैसे दिले नाही तर मी मोठमोठ्याने आरडाओरडा करून माझी छेड काढून माझ्याशी बळजबरी केली’, असे म्हणून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी. खंडणीचा गुन्हा दाखल.
अहमदनगर: महिलेने वाहन चालकाकडे वाहन चालकाने दिलेल्या लिफ्ट मागितली. तिला लिफ्ट देताच छेड काढल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत वाहन चालकाकडे पैसे मागितल्याची घटना नगर- सोलापूर रस्त्यावरील चांदणी चौकात शनिवारी (दि. फिर्यादीवरून महिले विरोधात भिंगार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज निंबाळकर (वय २३ रा. निगडी, पुणे, मुळ रा. जुन्नेवाडी, ता. पाटोदा) यांनी फिर्याद दिली आहे. ते शनिवारी सकाळी नगर सोलापूर रस्त्याने जात असताना चांदणी चौकात फळे घेण्यासाठी थांबले. तेवढ्यात एक महिला त्यांच्या वाहनात येऊन बसली
व मला पुढे सोडा, असे म्हणाली. निंबाळकर यांनी बाहन चालू करून सोलापूर रस्त्याने जात असताना त्या महिलेने निंबाळकर यांच्याकडे दोनशे रूपये सुट्टे मागितले. त्यांनी दोनशे रुपये देताच त्या महिलेने आणखी तीन हजार रुपयांची मागणी केली. ‘पैसे दिले नाही तर मी मोठमोठ्याने आरडाओरडा करून माझी छेड काढून माझ्याशी बळजबरी केली’, असे म्हणून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. निंबाळकर यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून ती महिला कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत.
Web Title: Threatening to implicate me in a false crime as ‘teasing and forcing me’. Offense of extortion
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News