आ. रोहित पवार हे एक संयमी नेता हे त्यांनी आपल्या कृतीतून अकोलेतील जनतेला दाखवून दिले
अकोले: अकोले तालुका पत्रकार संघ, अकोले पत्रकार दिनानिमित्त आमदार रोहित पवार यांचे जाहीर ग्रामीण महाराष्ट्र आव्हाने आणि उपाय या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी अकोले तालुक्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोलजी वैद्य होते. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी अकोले मतदार संघाचे आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. या कार्यक्रमात अकोले तालुक्यातील जवळपास सर्वच पत्रकारांनी उपस्थिती दाखविली.
कार्यक्रमांतर्गत आ. रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला त्याच बरोबर रोहित दादा यांच्या हस्ते ग्रामीण कर्तुत्वान महिला व आ. डॉ. किरण लहामटे यांचा सत्कार करण्यात आला. २०२० वर्ष हे दोन्ही आमदारांसाठी नवीन आशा नवीन उमेद घेऊन आलेले आहे. या दोघांचीही वाटचाल एक जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी राहिली आहे.
डॉ. किरण लहामटे यांनी आपल्या वक्तव्यातून अकोले तालुक्यातील पत्रकारांचे आभार मानले ते म्हणाले की, मी आमदार होण्यापाठीमागे तालुक्यातील पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे. अकोले तालुक्यातील पत्रकारिता हि जाहिरातीसाठी चालत नसून ती तत्वांच्या आधारे चालते असाही त्यांनी उल्लेख केला. त्याचबरोबर अकोले तालुका हा पर्यटनासाठी प्रति काश्मीर आहे. येथे पर्यटनाचा विकास व्हायला पाहिजे या दृष्टीने तसेच जनतेचा विकासाच्या दृष्टीने आपण येत्या १८ तारखेला तालुक्यातील प्रतिष्ठावान लोकांसोबत सहविचार सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार रोहितदादा पवार हे एक संयमी नेता आहेत हे त्यांनी आपल्या कृतीतून जनतेला दाखवून दिले. आपले भाषण चालू असताना मुस्लीम बांधव नमाज करीत असताना त्यांनी आपले भाषण पाच ते सात मिनिटे थांबविले हे एक त्यांचे वैशिष्ट्य अकोले तालुक्यातील जनतेला पहायला मिळाले. या कृतीतून त्यांची सहानुभूती व संयमीपना व्यक्त झाला.
आ.रोहितदादा पवार यांनी आपल्या भाषणातून जेव्हा आम्ही राजकीय व्यासपीठावर असतो तेव्हा राजकारण करतो आता ते मला करू वाटत नाही पण कोणतेही धोरण राबवयाचे असेल तर त्यासाठी चांगला अभ्यास करावा लागतो. मतदार संघाचा अभ्यास करावा लागतो तेथील समस्या जाणून घ्याव्या लागतात. नगर शहराचा अभ्यास माझा काही प्रमाणात झाला आहे. नगर शब्द जेव्हडा सोप्पा असला तरी येथील राजकारण इतके सोपे नाही हे लोक म्हणत होते ते खर आहे अस मला वाटते. शरद पवार साहेबांसोबत महाराष्ट्रात फिरलोय ज्या ठिकाणी गेलो तेथील अडचणी वेगवेगळ्या आहेत. ज्या काही कॉमन अडचणी आहेत त्या कदाचित सगळीकडे असू शकतात त्या म्हणजे आज पाणी हा विषय अतिशय महत्वाचा आहे. आपल्याच तालुक्यात घ्या इथे काही मोठे मोठे धरणे आहेत धरणे असताना सुधा उन्हाळ्यात आपल्याला कधी कधी पाण्याचा तुटवडा होतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला शेती कशी करता येईल पाणी अडविता येईल का याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. शासनामध्ये असताना लोक म्हणतात कि तुम्ही आम्हाला शिकवू नका तुम्ही आम्हाला काय धोरण आखतात ते सांगा.पण या ठिकाणी मी शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून मी आलो नाही तर मी व्याख्यान देण्यासाठी आलो आहे. निराची शेती आपण केली तर त्यातून उत्पन्न आपल्या खूप मोठ्या प्रमाणात मिळू शकत त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी कमी आहे. त्याठिकाणी आपल्याला वेगळी शेती करता येईल का त्या आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. पाण्याचे योग्य नियोजन आपल्याला करता येईल का याचा अभ्यास केला पाहिजे. ग्रामीण भागात शिक्षण हि खूप मोठी अडचण आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण हे दिले जाते तिथे असणारे शिक्षक खूप मनापासून शिकवत असतात पण आपण कधी जि. परिषद शाळांमध्ये गेलो आहोत का काही शाळा खूप चांगल्या आहेत पण काही शाळांमध्ये ज्या प्रकारे शिक्षण दिले जाते. खोल्या धड नसतात पाणी गळत असते आणि अशात ती मुले त्या ठिकाणी बसून शिकत असतात आणि ते शिक्षक शिकविण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्ही जर विद्यार्थ्यांना विचारले की जसे मी ठाकरवाडी शाळेत गेलो आणि तुम्हाला मोठे होऊन काय बनायचे कुणालाही त्याबाबतीत काही कळत नव्हत कदाचित त्यांना ते घाबरल्यासारखे वाटत असेल हेच कर्जत मधील शाळेत विचारले तर ते मोठ्याने सांगायचे मला पोलीस बनायचे हाच फरक वेगवेगळ्या भागात दिसून येतो. त्यांच्या विकासासाठी विचार आपल्याला करावा लागेल. शिक्षण हे योग्य पद्धतीने मिळायला हवे नाहीततर हीच मुले पुढे म्हणतील आम्हाला नोकरी द्या. युवकांना डिगरी मिळाली त्यांना शिक्षणही चांगल्या चांगल्या कॉलेज मधून झालंय पण पाच पाच वर्ष झाली नोकरी नाही. त्यांचा विचार करत असताना शिक्षण पद्धत आपल्याला काही प्रमाणात बदलावी लागेल.
राजकीय इलेक्शन येत तेव्हा या युवकांना वापरलं जात राजकारण इलेक्शन संपल कि या युवकांकडे सर्वच दुर्लक्ष करतात. युवकांनी तालुक्यातील संधी आपण शोधली पाहीजे. जर या तालुक्याला आपल्याला पर्यटन तालुका बनविण्याचे निश्चित करू शकतो पण त्यासाठी प्रयत्न हे केले गेले पाहिजेत.
मी कर्जत जामखेड मतदार संघात एक टीपका देखील दारू वाटली नाही. मी त्या ठिकाणी एक रुपया सुधा मतासाठी वाटला नाही. जे म्हणायचे आपण काहीच वाटले नाही तीच मंडळी मला निकालाच्या दिवशी खांद्यावर घ्यायला पुढे होती. हि वाटायची प्रथा आपण मोडून काढली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
Website Title: Latest News Rohit Pawar in Akole taluka