ब्रेकिंग न्यूज: भावाच्या छळाला कंटाळून बहिणीने उचलले टोकाचे पाऊल
Breaking Crime News: छळाला कंटाळून बहिणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना.
Pimpari Chinchwad: पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाच्या छळाला कंटाळून बहिणीने थेट आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. भावाला दिलेले पैसे परत मागितल्याने भावासह त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याच छळाला कंटाळून बहिणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या (Suicide) केली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनीता ऊर्फ नीता रामेश्वर राठोड (वय 31 वर्ष, रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता आणि रामेश्वर यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुले आहेत. दोघेही मजुरीचे काम करत होते. दरम्यान, सुनीता यांनी आपला भाऊ संदीप याला दोन लाख रुपये उसने दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत भावाने पैसे दिले नसल्याने ते पैसे परत मागण्यासाठी 3 डिसेंबर रोजी सुनिता या भावाच्या घरी गेल्या होत्या. मात्र, पैसे न देता भावाच्या पत्नीने त्यांना शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले.
भावाच्या पत्नीने मारहाण केल्यावर त्याच दिवशी रात्री उशिरा पुन्हा सुनिता यांच्या भावाच्या पत्नीने सुनीता यांना त्यांच्या घरी जाऊन मारहाण केली. या प्रकरणी 4 डिसेंबर रोजी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 5 डिसेंबरला भावाने आणि त्याच्या पतीने मारहाण केल्यावर, 6 डिसेंबर रोजी सुनीता सकाळी दहा वाजता ताथवडे येथे बेशुद्ध अवस्थेत दिसल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे, याप्रकरणी सुनीता यांचे पती रामेश्वर राठोड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनीता यांचा भाऊ संदीप शामराव चव्हाण आणि त्याच्या पत्नी (दोघे रा. ताथवडे) विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Tired of torture, sister committed suicide by consuming poison
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News