शरीरसंबधास विरोध केल्याने महिलेचा खून, उसाचा फडात मृतदेह ओढून पेटवला फड
Breaking News: शरीरसंबधास विरोध केल्याने महिलेचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोल्हापूर : शरीर संबंधास विरोध केल्याने भादवण (ता. आजरा) येथील आशाताई मारुती खुळे (वय ४२) या महिलेचा गळा आवळून खून केला. ही घटना काल गुरुवार (दि २८) शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात घडली. त्यानंतर संशयित योगेश पांडुरंग पाटील (४६ रा. भादवण) याने घटना उघडकीस येवू नये म्हणून ऊसाचा फड पेटवून दिला.
भादवण ते भादवणवाडी रस्त्यावरील शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात सदर महिलेला ओढत नेऊन योगेश यांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आशाताई हिने विरोध केल्याने योगेशने तिचा गळा आवळून खून केला. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असून ती आईसोबत भादवण येथे राहते. तर योगेश हा विवाहित असून त्याला दोन मुली आहेत.
संशयित आरोपी उसाच्या फडाला लागलेली आग विझविण्यास व मृतदेह फडातून बाहेर काढण्यास पुढे होता. त्यामुळे ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र पोलिस दलात असलेले गावातीलच समीर संभाजी कांबळे यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Web Title: woman was Murder for resisting intercourse, the body was dragged in a sugarcane pile and set on fire
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News