धक्कादायक! अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर भावासह तिघांनी केला बलात्कार
Pune Crime: एका अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिच्या मित्र, भावासह तिघांनी बलात्कार (raped) केल्याची घटना.
पुणे : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनामुळे संताप व्यक्त होत असताना पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंढवा येथे एका अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिच्या मित्र, भावासह तिघांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडित मुलीने तिच्या शिक्षिकेकडे कैफियत मांडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मुंढवा परिसरातील केशवनगर येथील एका सोसायटीत सन 2018 पासून 2023 पर्यंत सुरु होता.
याबाबत कर्णबधीर शाळेच्या एका 51 वर्षीय महिला शिक्षिकेने मुंढवा पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. यावरुन सागर रजाने (वय-30 रा. उंड्री, कोंढवा), राहुल पाटील (वय-23) यांच्यासह एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर (पीडितेचा भाऊ) आयपीसी 376, 376/2/एन, 323, 506 सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 17 वर्षाची आहे. आरोपी सागर याने पीडित मुलगी रहात असलेल्या घरी येऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिला माराहण करुन याबाबत कोणाला सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली. तर पीडित मुलीच्या अल्पवयीन भावाने ती घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले. तसेच पीडित मुलीचा मित्र राहुल पाटील याने तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडित मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार शाळेतील शिक्षिकेला सांगितला. त्यानंतर शिक्षिकेने मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.
Web Title: minor deaf girl was raped by three people along with her brother
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App