Home क्राईम महाराष्ट्र हादरला! 64 वर्षीय महिलेवर अत्याचार करुन नको त्या भागावर बेदम मारहाण,...

महाराष्ट्र हादरला! 64 वर्षीय महिलेवर अत्याचार करुन नको त्या भागावर बेदम मारहाण, प्रकृती चिंताजनक

Crime News: धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये एका 64 वर्षीय महिलेवर अत्याचाराची (abused) घटना.

 

64-year-old woman was abused and brutally beaten on unwanted areasमुंबई: मुंबईमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये एका 64 वर्षीय महिलेवर अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपीने या पिडीत महिलेच्या चेहऱ्यावर, डोक्यात, प्रायव्हेट पार्टवर आणि शरीरावर अमानुष वार केले आहेत.

या घटनेनंतर ती बेशुद्ध झाली आहे. आरोपीने महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या पिडीत महिलेची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत, तर या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी उमेश गुलाबराव ढोक वय 38 वर्ष याने महिलेला घरी सोडतो असं सांगून महिलेला आपल्या घरी नेले. त्यानंतर त्याने महिलेवर अत्याचार केले. महिलेने विरोध केल्यावर आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं आणि आरोपी पळून गेला.

मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास स्थानिक महिलेला ही पीडित महिला रस्त्यावर आढळूली. महिलेने संबधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, महिलेला उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

याप्रकरणी चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया वयाचेही भान न ठेवता मातेसमान स्त्रीलाही उपभोगाची वस्तू मानत केवळ आपल्या शारीरिक हव्यासापोटी एका ६४ वर्षीय महिलेवर ३८ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द इथे घडलीय.

घरी सोडतो असे खोटे सांगून उमेश ढोके नावाचा हा नराधम चेंबूर मधील घरकाम व मासेविक्री करणाऱ्या त्या महिलेला मानखुर्द येथील आपल्या राहत्या घरी घेऊन गेला. रात्रभर तिच्यावर बलात्कार करत, नंतर मारहाण करत पहाटे घराबाहेर विवस्त्र अवस्थेत त्याने तिला फेकून दिले.

या घटनेबाबत कळताच पोलिसांनी घटनास्थळी जात पीड़ित महिलेला उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

तर आरोपी ढोकेलाही तासाभरातच अटक करून त्याची चौकशी सुरू केली. त्यात त्याने गुन्ह्याचीही कबुली दिली असल्याने लगेचच त्याच्यावर बलात्कार- मारहाण संबंधित कलमांतर्गत ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज राजावाडी मी व माझी माझी सहकारी आशा मराठे हॉस्पिटलमध्ये जाऊन या प्रकरणातील पीडित महिलेची व तिच्या परीवाराची भेट घेतली.

आज पहाटेच पिडीतेला हॉस्पिटल ला दाखल केल्याने अजुन दोन दिवसांनी पुन्हा एकदा तिच्याशी बोलून आणखी काही म्हणण तिच असेल तर त्याची नोंद घेतली जावी

तसेच मनोधैर्य योजनेसाठीच्या कागदपत्रांची पुर्तता पोलिसांनी लवकर करून संबंधित विभागात पाठवावी ही विनंतीही पोलिसांना केली

पोलिसांनी ॲक्शन घेत ज्या तत्परतेने आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला तितक्याच जलद गतीने कारवाई होत त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा होईल, हे नक्की ! कारण, महिलांची सुरक्षितता ही प्राथमिकता मानणारे आमचे संवेदनशील सरकार अशा घटनांकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही.

Web Title: 64-year-old woman was abused and brutally beaten on unwanted areas

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here