Home अहमदनगर संगमनेर: बाप लेकाचा वाद अन तीन पोलिसांना मारहाण काय आहे प्रकरण

संगमनेर: बाप लेकाचा वाद अन तीन पोलिसांना मारहाण काय आहे प्रकरण

Sangamner Crime: बाप लेकाच्या वादात झालेल्या मारहाणीत सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना.

Crime Father-daughter dispute and beating of three policemen

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे धक्कादायक पोलिसांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बाप लेक यांच्यात झालेल्या मारामाऱ्यामध्ये सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्यावर याच बाप लेकांनी भाजी कापण्याच्या सुरीने हल्ला केला. तसेच काठीने मारहाण करुन धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली.

यामध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल बन्सी येसू टोपले, ओंकार शेंगाळ आणि राजेंद्र घोलप असे तीन पोलीस जखमी झाले आहेत.

याप्रकरणी तेजस दत्तू काशिद व दन् काशिनाथ काशिद (दोघे रा. बडगाव पान, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दि. ९ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे दत्तू काशिद याने आपल्या मुलीस मारहाण केली. तेव्हा त्यांचा मुलगा तेजस काशिद याने बहिनीला मारहाण कशाला केली या कारणाहून बाप लेकांमध्ये वाद झाले. दोघांचे वाद टोकाला गेल्यामुळे तेजस याने तेथेच असणारी एक मोटार उच्चलून ती बापाच्या डोक्यात टाकली. त्यामुळे हा वाद अधिक विकोपाला गेला. दोघांनाही गावक-यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मिटला नाही. दोघे एकमेकांना भिडले आणि त्यांच्यातमारहाण सुरू झाल्या म्हणून या घटनेतून एखादा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून काही व्यक्तींनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली.

पोलीस कर्मचारी, ओंकार शेंगाळ राजेंद्र घोलप यांनी वडगावपान गाठले. या दोघांना समजून प्रयत्न केला. मात्र, माघार घेण्याच्या नव्हते. तेव्हा दोघांना पोलीस गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. तेजस याने गाडीत विरोध करुन पळ प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी धिटाई केली असता बापलेक एकत्र आले. हे आमच्या घरातील भांडणे आहेत आम्ही ती मिटवून घेऊ, तुम्ही येथून चालते व्हा. असे सांगितले. यावेळी आरोपी तेजस याने त्याच्या हातातील सुरी पोलीस ओंकार शेंगाळ यांच्या डोक्यात मारली, तर राजेंद्र घोलप यांच्या उजव्या हातावर मारली. तसेच दत्तू याने देखील काठीने पोलिसांना मारत धक्काबुकी केली. याप्रकरणी दत्तू काशीद यास अटक केली असून बाप लेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime Father-daughter dispute and beating of three policemen

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here