संगमनेर: वाळू वाहतूक करणारी पिकअप थेट विहिरीत कोसळली अन….
Sangamner News: पोलीस पाठलाग करीत असताना नजर चुकविण्याच्या नादात रिकामी मोकळी पिकअप थेट शेतातील एका विहिरीतच कोसळल्याची घटना. (Driver Death).
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक शिवारात शनिवारी पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. पोलीस पाठलाग करीत असताना नजर चुकविण्याच्या नादात रिकामी मोकळी पिकअप थेट शेतातील एका विहिरीतच कोसळल्याची घटना समोर आली आहे. वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारी पिक अप विहिरीत कोसळली अन ३ मजूर विहिरीतून बाहेर येत थोडक्यात बचावले. तर पिकअप चालकाचा मात्र विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक परिसरातील प्रवरा नदी पात्रामधून विना परवाना बेकायदेशीररित्या वाळूने भरलेली पिकअप धांदरफळ बुद्रुकच्या दिशेने खाली होऊन येत असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या पिकअपचा पाठलाग सुरु केला. अस ल्याची माहिती पिकअप चालक गोरखनाथ खेमनर (वय 23, राहणार डिग्रस, ता. संगमनेर) याच्या लक्षात आली.
त्याने पोलिसांचा पाठलाग चुकविण्याच्या नादात भर धाव वेगाने पिकअप एका शेतात घातली. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे पिकअप चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला अन वाळूची रिकामी पिकअप थेट रस्त्या लगत असणाऱ्या शेतातील एका खोल विहिरीत कोसळली. या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Web Title: A pick-up transporting sand fell directly into the well and driver Death
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App