धक्कादायक! कमी मार्क दिले म्हणून प्राध्यापकाला चाकूने भोसकले
Crime News: परीक्षेत गुण कमी दिल्याचा राग मनात ठेवून एका विद्यार्थ्याने चक्क प्राध्यापकाला चाकूने भोसकले.
अमरावती: परीक्षेत गुण कमी दिल्याचा राग मनात ठेवून एका विद्यार्थ्याने चक्क प्राध्यापकाला चाकूने भोसकले. या घटनेत तीस वर्षीय प्राध्यापक चैतन्य अरविंद गुल्हाने हे गंभीर जखमी झाले आहेत. ६ नोव्हेंबरला सायंकाळी मार्डी रोडवरील संत अच्युत महाराज हॉस्पिटलसमोर ही घटना घडली.
याप्रकरणी, अमर सभादिंडे या सहकारी प्राध्यापकाच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी विद्यार्थी अर्पित जयवंत देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो फरार आहे. प्रा. चैतन्य गुल्हाने हे मार्डी रोडस्थित डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मसी येथे कार्यरत असून, ते अॅनालिसीस हा विषय शिकवतात, तर अर्पित देशमुख हा त्याच कॉलेजमध्ये बी. फॉर्मसीच्या अंतिम वर्षाला आहे.
Web Title: professor was stabbed for giving low marks
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App