संगमनेर: तीन पोलिस कर्मचारी निलंबित, कारागृहाचे गज कापून चार आरोपी पसार
Sangamner News: गज कापण्यासाठी आरोपींना वस्तू कुणी पुरविली? अथवा त्यांच्याजवळ ती कशी आली? याचाही तपास पोलिस करत आहेत. पळून गेलेल्या आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची पाच पथके रवाना.
संगमनेर: संगमनेर कारागृहातून चार आरोपी पळून गेल्याची घटना बुधवारी (दि.८) सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली. बराक क्रमांक तीनमध्ये असलेल्या चार आरोपींनी गज कापल्यानंतर ते बाहेर आले, पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात बसून ते पळून गेले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल देवीदास काळे (रा. वडगाव पान, ता. संगमनेर), रोशन रमेश ददेल (रा. संगमनेर), अनिल छबू ढोले (रा. संगमनेर), मच्छिंद्र मनाजी जाधव (रा. घारगाव, ता. संगमनेर) अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. ते गंभीर गुन्ह्यात आरोपी असून १ ते ३ वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत होते.
संगमनेर तहसील कार्यालय परिसरात शहर पोलिस ठाणे तसेच इतरही काही शासकीय कार्यालये आहेत. शहर पोलिस ठाण्याला लागूनच कारागृह आहे. या कारागृहाच्या बराक क्रमांक तीनमध्ये असलेल्या काळे, ददेल, ढोले आणि जाधव यांनी गज कापल्यानंतर ते बाहेर आले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर एक चारचाकी वाहन उभे होते, त्या वाहनात बसून ते पळून गेले. घटनेची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे हे पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांच्या पथकाने त्यांचा आहेत. शोध सुरू केला आहे.
गंभीर गुन्ह्यातील आरोपी
राहुल देवीदास काळे हा २०२० मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
रोशन रमेश ददेल आणि अनिल छबू ढोले यांच्याविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात २०२१ मध्ये अत्याचाराचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
तसेच मच्छिंद्र मनाजी जाधव याच्या विरोधात घारगाव (ता. संगमनेर) पोलिस ठाण्यात २०२२ मध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न करणे. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
तीन पोलिस कर्मचारी निलंबित
संगमनेर कारागृहातील चार आरोपींनी पलायन केल्याप्रकरणी कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. संगमनेर कारागृहातून बुधवारी सकाळी चार आरोपी कोठडीचे गज कापून पसार झाले. यावेळी कारागृहात कर्तव्यावर असणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ मदने यांनी ओला यांच्याकडे पाठविला होता. रात्री या प्रस्तावावर कार्यवाही करण्य आली. त्यानुसार राजू अनाजी गोडे (हेड कॉन्स्टेबल), राजू गंगाराम मेंगाळ (पोलिस कॉन्स्टेबल), सुषमा अशोक भांगरे (महिला पोलिस कॉन्स्टेबल) या तीनही कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरु करण्यात आल्याचे ओला यांनी सांगितले.
कापण्यासाठी आरोपींना वस्तू कुणी पुरविली? अथवा त्यांच्याजवळ ती कशी आली? याचाही तपास पोलिस करत आहेत. पळून गेलेल्या आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली आहेत.
Web Title: Three police personnel were suspended, four accused escaped by cutting the prison
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App