धक्कादायक! मुलगाच हवा म्हणून दोघींचा घोटला गळा, जवानाचे कृत्य
Nanded Crime: आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीसह तीन वर्षांच्या मुलीची पतीनेच गळा आवळून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना. तिहेरी हत्याकांड.
कंधार | नांदेड: नांदेड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीसह तीन वर्षांच्या मुलीची पतीनेच गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील बोरी खु. येथे बुधवारी पहाटे घडली. माहेरहून पैसे घेऊन ये आणि तुला मुलीच होतात, या कारणावरून या हत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली.
एकनाथ जायभाये असे आरोपीचे नाव असून तो भारतीय सैन्य दलात सेवेत आहे. पहाटे जायभाये याने पत्नी भाग्यश्री आणि मुलगी सरस्वती या दोघींचा गळा आवळून खून केला आणि तो घरातून निघून गेला. हत्या केल्यानंतर भाग्यश्री हिच्या माहेरी मुलीची हत्या केल्याची माहिती त्याने स्वत:च दिली. त्यानंतर तो थेट माळाकोळी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
मयत भाग्यश्री यांची आईने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तुला मुलगीच कशी झाली, आम्हाला मुलगा पाहिजे होता, असे म्हणून सासरी छळ होत होता. भाग्यश्री कंधार दुसऱ्यांदा गरोदर झाल्यानंतर तुला दुसरी पण मुलगीच आहे. तू चेक कर असा तगादा लावला होता.
Web Title: Eight months pregnant wife along with three year old daughter was Murder by her husband
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App