Home कोल्हापूर गुरांसाठी चारा काढण्यासाठी गेल्या, विजेचा धक्का लागून सासू-सुनेचा जागीच अंत

गुरांसाठी चारा काढण्यासाठी गेल्या, विजेचा धक्का लागून सासू-सुनेचा जागीच अंत

Kolhapur News: जनावरांसाठी कडबाकुट्टी काढायला गेले असताना सासू-सुनेचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना. (electric shock Accident)

collect fodder for cattle, mother-in-law died on the spot due to an electric shock kolhapur

कोल्हापूर: जनावरांसाठी कडबाकुट्टी काढायला गेले असताना सासू-सुनेचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. करवीर तालुक्यातील म्हाळुंगे इथं शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.  या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आनंदी मोरबाळे आणि सुनीता मोरबाळे असं मृत्यू सासू सुनेचं नाव आहे. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शामराव मोरबाळे हे जनावरांचे दूध काढण्यासाठी नेहमीप्रमाणे आई आणि आपल्या पत्नीला घेवून स्मशानभूमी जवळ असलेल्या गोठ्यात आले होते. दूध काढून ते मोटरसायकलवरून डेअरीमध्ये दूध देण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांच्या आई आणि पत्नीने जनावरांना वैरण बारीक करण्या करीता कुट्टी मशीन सुरू केलं.

मात्र काळाने डाव साधला आणि विजेचा धक्का जोरात बसल्याने त्या दोघींचा जमिनीवर कोसळून जागीच मृत्यू झाला. दरम्यान, बराच वेळ झालं आई आणि पत्नी घराकडं का आल्या नाहीत हे बघण्यासाठी शामराव मोरबाळे यांनी आपल्या वहिनीला गोठ्याकडे जाऊन पाहण्यास सांगितले. यावेळी त्यांना सासू आणि जाऊ जमिनीवर कोसळलेल्या दिसल्या. तातडीने त्यांनी नातेवाईकांना बोलावून विद्युत प्रवाह सुरू असलेलं मशीन बंद केलं. तसेच दोघींनाही उठवण्याचा प्रयत्न केला मात्र मोरबाळे सासू सूनेचा जागीच मृत्यू झाला होता. या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे मोरबाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: collect fodder for cattle, mother-in-law died on the spot due to an electric shock

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here