Home अकोले भंडारदरा परिसर पर्यटकांनी हाऊसफुल, गर्दी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी

भंडारदरा परिसर पर्यटकांनी हाऊसफुल, गर्दी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी

Bhandardara Dam: धरणाच्या भिंतीजवळ गर्दी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी.

Bhandardara Dam is full of tourists, there is a big traffic jam due to overcrowding

भंडारदरा : स्वातंत्र्य दिन आणि उद्या पारशी नववर्षाच्या सुट्टीचा‌ आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्हयातील भंडारदरा धरण परिसर सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुलाला आहे. धरणाच्या भिंतीजवळ गर्दी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. पोलिस प्रशासनाने संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर एकेरी वाहतूक नियमन केल्याने पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख भंडारदरा धरण परिसराची आहे. हिरवाईने नटलेला परिसर, डोंगर माथ्याहून कोसळणारे धबधबे, धरणाच्या भितींवरून ओसंडून वाहणारे पाणी बघण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. रंधा फॉल, नेकलेस फॉल, बाहुबली फॉल, रिव्हर्स फॉल, सांदण दरी, घाटघर, कोकणकडा त्याचबरोबर राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर यासह भंडारदरा परिसरात अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. एकूणच बघितलं तर भंडारदरा धरण परिसरातील निसर्गाने सध्या कात टाकली आहे. त्यामुळे तुम्हालाही निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर लवकरच भंडारदरा धरण परिसरात जावे लागेल.

ज्या ठिकाणी पाणी आहे तिथं जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. सलग सुट्टी आल्यामुळे पर्यटन ठिकाणी गर्दी होत आहे. भंडारदरा धरण ९७ टक्के भरलेले असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

Web Title: Bhandardara Dam is full of tourists, there is a big traffic jam due to overcrowding

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here