Home अकोले अकोले ब्रेकिंग: हरिश्चंद्रगडावर पर्यटकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

अकोले ब्रेकिंग: हरिश्चंद्रगडावर पर्यटकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Akole news: हरिश्चंद्र गडावर एका पर्यटकाचा मृत्यू (Death).

Death of a tourist at Harishchandragad

अकोले : हरीश्चंद्रगड या पर्यटनस्थळे पर्यटक ट्रेकिंग करण्यासाठी येत असतात. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. धुके पाउस सर्वत्र सुरु आहे.  पर्यटक जीवावर बेतेल असे धाडस करीत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. हरिश्चंद्र गडावर एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. तीन जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. धुक्यामुळे पर्यटक रस्ता भरकटले होते. जंगलात अडकल्याने त्यांना बाहेर पडणे मुश्कील झाले.

पुण्याहून आलेले सहा तरूण दोन दिवस हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी आले होते. 1 ऑगस्ट रोजी ते येथे दाखल झाले.  तोलार खिंडीतून त्यांनी गडावर चढण्यास सुरूवात केली होती.  मात्र, मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे हे पर्यटक रस्ता भरकटले.  अथक प्रयत्न करुनही त्यांना जंगालातून बाहेर पडण्याचा रस्ता सापडला नाही.  रस्ता भरकटल्याने या सहा जणांनी डोंगर कपारीतच मुक्काम केला.

थंडी आणी पावसामुळे एका पर्यटकाची प्रकृती खालावली. रात्रभर थंडीने काकडल्याने गुरुवारी रात्री या पर्यटकाचा मृत्यू झाला.  बाळू नाथाराम गिते असं मृत पर्यटकाचे नाव आहे. तर, आणखी तीन पर्यटकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ग्रामस्थ, वनविभाग आणी पोलीस प्रशासनाने मृत व्यक्तीसह पर्यटकांना गडावरून रेस्क्यू केले आहे.

Web Title: Death of a tourist at Harishchandragad

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here