Home औरंगाबाद बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थांने स्कार्फच्या साह्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले

बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थांने स्कार्फच्या साह्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले

मावशी काकाच्या घरी शिक्षणासाठी आलेल्या बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थांने स्कार्फच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

student of class 12th hanged himself with a scarf Suicide

छत्रपती संभाजीनगर : मावशी काकाच्या घरी शिक्षणासाठी आलेल्या बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थांने स्कार्फच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  रविवार रात्री ९ वाजता ही घटना उघडकीस आली. अभ्यासात हुशार विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  सुमित गणेश बारगळ वय १८ रा. ह.मू. यशवंत नगर बीड बायपास जळगाव घाट ता. कन्नड असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सुमितचे आई वडील शेती करतात. तर त्याचा मोठा भाऊ आयआयटीमध्ये आहे. गेल्या १०-१२ वर्षांपासून सुमित हा त्यांच्या मावशी काकाकडे छत्रपती  संभाजीनगर शहरात राहतो.

१० वी नंतर सुमिताचा शासकीय कोट्यातून पॉलिटेक्निकसाठी नंबर लागला होता. पण मोठा भाऊ आयाटीमध्ये आहे. यामुळे सुमित याला देखील त्याच क्षेत्रात करिअर करायचं असल्याने त्याने पॉलिटेक्निकचां प्रवेश रद्द केला. आता तो बारावीच्या परीक्षेची तयारी करत होता. दरम्यान, शनिवारी गावाकडे धोंड्याचा कार्यक्रम असल्यामुळे काका आणि मावशी गावी निघाले. यावेळी सुमित याला विचारल्यास त्यांनी येण्यास नकार दिला. सुमित ३ दिवस घरी राहणार असल्यामुळे मावशीने त्याला स्वतःचा मोबाईल दिला. शनिवारी तो क्लाससाठी गेला. मात्र क्लासमध्ये तो कोणाशीच बोलला नाही.

रविवारी मावशी काका येणारा असल्याने गावाकडून जेवण घेऊन येणार आहे. हे सांगण्यासाठी मावशी काकाने कॉल केला असता त्याने कॉल घेतला नाही. यावेळी शेजारच्या सुमितला आवाज देण्याचे सांगितलं. मात्र, सुमिताने दार उघडले नाही. शेजारच्यानी गॅलरीमधून बघितले असतात सुमितने गळफास घेतला होता. त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सूमितने आत्महत्या (Suicide reason) का केली याचं कारण अद्याप समोर आले नाही.  

Web Title: student of class 12th hanged himself with a scarf Suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here