राजूर घाटात ५५ प्रवाशांची बस पलटी, एसटीचा भीषण अपघात
Buldhana ST Bus Accident: मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात, चालकाचे नियंत्रण सुटले, बस थेट राजूर घाटात पलटी.
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं. ही बस थेट राजूर घाटात पलटी झाली. बसमधून ५५ प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रवाशांमध्ये काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याचं कळतंय. अपघातात १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती कळत आहे.
मलकापूर- बुलढाणा बसच्या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सध्या बाहेर काढण्यात येतंय. ब्रेक फेल झाल्यानेच हा अपघात झाल्याची माहिती सध्या कळत आहे. सुदैवानं अद्याप अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त आलेलं नाही.
मलकापूर-बुलढाणा बस राजूर घाटात आल्यानंतर बसचे ब्रेक फेल झाले. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.
मलकापूरहून बुलढाणाकडे ही बस निघाली होती. मोहेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. प्रवाशांना किरकोळ मार लागल्याचं वृत्त आहे. बस क्रमांक ८३७५ चा जॉईंटर निसटला आणि बस मागे मागे जाऊ लागली. दरम्यान ब्रेक दाबत असताना एसटी बस पलटी झाली, अशी प्राथमिक माहिती बुलढाणा आगाराकडून माहीती मिळाली आहे.
Web Title: Buldhana ST Bus Accident 55 passengers
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App