Home क्राईम बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या घालून हत्या तर स्वतःवर गोळी...

बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या घालून हत्या तर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करुन स्वतः आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

police officer shot dead his wife and nephew and committed suicide by shooting himself

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  पुण्यात एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.  मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने  एकच खळबळ उडाली आहे.

अमरावती पोलीस दलात कार्यरत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पुण्यात राहणाऱ्या पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला आहे. खुनानंतर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. तर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.

Web Title: police officer shot dead his wife and nephew and committed suicide by shooting himself

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here