अंबित ओव्हरफ्लो, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
Ambit Overflow: मुळा नदीवरील अंबित लघु पाटबंधारे तलाव आज बुधवारी दुपारी 2 वाजता पुर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो.
अकोले: मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील अंबित लघु पाटबंधारे तलाव आज बुधवारी दुपारी 2 वाजता पुर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. अंबित प्रकल्पाची एकुण साठवण क्षमता 193 दलघफू आहे.
मुळा नदी आता वाहू लागली आहे. हे पाणी पिंपळगाव खांड धरणात जमा होईल. मुळा-भंडारदरा पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून चांगला पाउस पडत असून आज सकाळ पासून त्याचा जोर वाढला. सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.
Web Title: Ambit Overflow Today
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App