संगमनेर: लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांनी तरुणाची आत्महत्या
Sangamner News: जांबूत खुर्द येथे शेतकरी युवक मजुराची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
संगमनेर: तालुक्यातील जांबूत खुर्द येथे शेतकरी युवक मजुराची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंगावरील हळद फिटली नाही तेच जीवन यात्रा संपविली. पाच दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा संपन्न झाला होता.
पठार भागातील जांबूत खुर्द येथील पाच दिवसांपूर्वी पिंपळदरी येथे विवाह पार पडला होता. अंगावरील हळद देखील फिटलेली नाही तेच युवकाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दिनांक रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. जांबूत गावातील पोलीस पाटील यांनी आरुण बाळू पारधी यांनी फाशी घेतली असल्याचे आढळून आले. प्रथमदर्शी नागरिकांना धक्काच बसला. पोलीस पाटील यांच्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नुकतेच २१ मे रोजी त्याचा विवाह झाला होता. नवरी पहिली बोळवण म्हणून माहेरी गेली होती. तिला आणायला जायचे होते. मात्र युवक अरुण याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पारधी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. आरुणने नेमकी काय कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास घारगाव पोलीस करीत आहे.
Web Title: young man commits suicide just five days after marriage
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App