झोपेतच तरुणाला केले ठार, तर माजी उपसरपंचाचा घेतला जीव, दोन खुनाच्या घटना जिल्हा हादरला
Jalana Crime: तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून (Murder) केल्याची घटना, माजी उपसरपंच तथा सोसायटीचे माजी चेअरमन यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या दोन्ही घटनांमुळे जिल्हा हादरला आहे.
जालना : घराच्या अंगणात झोपलेल्या प्रमोद जनार्दन झिने (३९) या तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना जालना शहरातील टीव्ही सेंटर भागात शनिवारी रात्री घडली. तर राजूर येथे रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास माजी उपसरपंच तथा सोसायटीचे माजी चेअरमन गोरखनाथ आत्माराम कुमकर (५२) यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या दोन्ही घटनांमुळे जिल्हा हादरला आहे.
शनिवारी रात्री जेवण करून घरासमोर असलेल्या पलंगावर झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास व्यक्तींनी झिने यांच्या डोक्यावर, मानेवर शरीरावर इतर ठिकाणी धारदार शस्त्राने वार करून खून केला. चालक म्हणून काम करीत होते. ते त्यानंतर मृतदेहावर कपडा टाकून तेथून फरार झाले. प्रमोद झिने यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, सहा मुली आणि अज्ञात एक मुलगा असा परिवार आहे. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावरच पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान असल्याने खळबळ आहे.
बांधकामावर असतानाच माजी उपसरपंचाचा खून राजूर येथील चणेगाव रस्त्यावर माजी उपसरपंच गोरखनाथ कुमकर यांचे नवीन घराचे बांधकाम सुरु आहे. रविवारी आठवडे बाजार असल्याने मजुरांना पैसे देण्यासाठी ते बांधकामावर थांबले होते. दुपारी साडेतीन वाजता तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांनी गोरखनाथ यांच्या डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. प्लॉट किंवा जमिनीच्या वादातून खून झाल्याची चर्चा आहे.
Web Title: young man was killed in his sleep, while a former deputy sarpanch was killed, two cases of murder
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App