मित्रासोबत समलैंगिक, महिलेसोबत अनैतिक संबंध, बँक अधिकाऱ्याची हत्या
Jalana Crime: समलैंगिक व अनैतिक संबंधातून बँक अधिकारी असलेले प्रदीप भाऊराव कायंदे यांचा खून (Murder) केल्याची बाब शुक्रवारी उघडकीस.
मंठा | जालना : समलैंगिक व अनैतिक संबंधातून बँक अधिकारी असलेले प्रदीप भाऊराव कायंदे यांचा खून केल्याची बाब शुक्रवारी उघड झाली. या प्रकरणी मंठा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सोपान सदाशिव बोराडे (३७) व प्रकाश सदाशिव बोराडे (४७, दोघे रा. शांतीनगर, मंठा) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिस तपासातील माहितीनुसार एका एजन्सीमार्फत एचडीएफसी बँक वसुली अधिकारी म्हणून काम करणारे प्रदीप कायंदे यांचे कार्यक्षेत्र जालना होते. ते समलिंगी संबंध ठेवणाऱ्या एका ग्रुपच्या संपर्कात आले होते. अनेकदा कामावरून देऊळगावराजा येथे घरी न जाता ते मंठा येथील त्याच्या समलिंगी संबंध ठेवणाऱ्या मित्राच्या घरी जात असत. असेच ७ एप्रिल या दिवशीही प्रदीप कायंदे त्यांच्या मित्राकडे गेले होते. मित्रासोबत समलिंगी संबंध प्रस्थापित झाले. दरम्यान, प्रदीप याचे एका महिलेशीही अनैतिक संबंध होते. यातून वाद होऊन संशयितांनी ८ एप्रिलला प्रदीपचा खून केला.
प्रदीप यांचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्यांचा मृतदेह मंठा मार्केट यार्ड परिसरात नेऊन टाकला होता, ही बाब तपासात समोर आली. यामध्ये एकूण चार आरोपी आहेत. त्यांपैकी दोघांना अटक केली असून आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
Web Title: Homosexual with a friend, immoral relationship with a woman, murder of a bank officer
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App