Home क्राईम लग्नास नकार दिल्याने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; NDA तील कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नास नकार दिल्याने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; NDA तील कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide).

Girl commits suicide by hanging herself for refusing marriage Case filed against NDA employee

पुणे : मुलांचा क्लास घेण्यासाठी येणार्‍या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रियंका यादव (वय २१, रा. उत्तमनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी  गुरींदरसिंग (रा. एनडीए क्वॉर्टर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत तिचा भाऊ प्रशांतकुमार दिलीप यादव (वय २५, रा. मोरसा रेसिडेन्सी, उत्तमनगर) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. ४४/२३) दिली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या राहते घरी २५ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण प्रियंका बी एम सीसी कॉलेजमध्ये एम कॉमचे शिक्षण घेत होती. ती एनडीएमध्ये दोन आर्मी लोकांच्या मुलांच्या घरी जाऊन एक वर्षापासून क्लास घेत होती. २५ मार्च रोजी ती सकाळी उठली व साडेदहा वाजता आंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी बाहेर न आल्याने तिच्या आईने दरवाजा वाजविला, तरी तिने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा फिर्यादीने दरवाजा तोडला असता तिने पाण्याची टाकी ठेवण्यासाठी तयार केलेल्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले.

पोलिसांना बाथरुममध्ये चिठ्ठी मिळाली. त्यात गुरींदरसिंग याच्याबरोबर ७ महिन्यांपासून प्रेमसंबंध आहेत. सुरुवातीला त्याने माझी बायको मला आवडत नाही. मी तिच्याशी घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करणार आहे. परंतु काही दिवसानंतर त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने मला लग्नास नकार दिल्याने मला आत्महत्या करण्याशिवाय कोणताच पर्याय राहिला नाही, असे चिठ्ठीमध्ये लिहिले होते.

याच्याबरोबरील फोटो पाहिल्यावर याच गुरींदरसिंग याच्या मुलांना ती शिकवायला घरी जात असल्याचे लक्षात आले.पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक चवरे तपास करीत आहेत.

Web Title: Girl commits suicide by hanging herself for refusing marriage Case filed against NDA employee

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here