Home क्राईम संगमनेर तालुक्यात दुकान फोडून १७ इलेक्ट्रिक मोटार लंपास तर शहरात घरफोडी

संगमनेर तालुक्यात दुकान फोडून १७ इलेक्ट्रिक मोटार लंपास तर शहरात घरफोडी

Sangamner News: संगमनेर तालुक्यात चोरीचे (Theft) सत्र सुरूच आहे. संगमनेरमध्ये मोटार चोरी व घरफोडी अशा दोन घटना समोर आल्या आहेत.

Sangamner taluka, 17 electric motors were theft by breaking into a shop and house burglary in the city

संगमनेर: संगमनेर तालुक्यात चोरीचे (Theft) सत्र सुरूच आहे. संगमनेरमध्ये मोटार चोरी व घरफोडी अशा दोन घटना समोर आल्या आहेत. तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक मोटार रिवाइडिंग चे दुकान फोडून दुकानातून एक इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्याची घटना घडली आहे.

तळेगाव दिघे गावातील कळसेश्वर मशिनरी नावाचे मोटार रिवायडींग च्या दुकानात शुक्रवारी पहाटे ही चोरी झाली असून अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटर चे कुलूप तोडून आज प्रवेश केला आणि दुरुस्तीसाठी आलेल्या १७ इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्या आहेत. या मुद्देमालाची रक्कम ३४ हजार रुपये आहे.

यामध्ये ७ इलेक्ट्रिक पाणबुडी मोटर, ७ बोअरवेलच्या मोटार आणि कडबा कुट्टी च्या ३ मोटार अशा एकूण १७ इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्या आहेत. संगमनेर तालुका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक पालवे हे करत आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपनगरात घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.

शहरातील केशवनगर, राहणे मळा, गुंजाळवाडी शिवार या ठिकाणी ही घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे दरम्यान येथील भिंतीवरून चढून दरवाजा उघडून घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेले आहेत. या चोरीमध्ये एकूण ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे

याबाबत बन्याबापू सूर्याभान सहाणे (रा. केशवनगर, राहणे मळा, गुंजाळवाडी शिवार, संगमनेर) यांनी फिर्याद दिली असून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Sangamner taluka, 17 electric motors were theft by breaking into a shop and house burglary in the city

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here