Home अहमदनगर अहमदनगर: एक लाखाची लाच घेताना विशेष लेखा परीक्षक रंगेहाथ पकडले

अहमदनगर: एक लाखाची लाच घेताना विशेष लेखा परीक्षक रंगेहाथ पकडले

Ahmednagar News: एका पतसंस्थेच्या चेअरमनकडून एक लाख रूपयांची लाच (Bribe) घेताना येथील जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयातील विशेष लेखा परीक्षक व खासगी लेखा परीक्षक रंगेहाथ पकडल्याची घटना. 

Special Auditor was caught red-handed while accepting a bribe

अहमदनगर:  नेवासा खुर्द येथील एका पतसंस्थेच्या चेअरमनकडून एक लाख रूपयांची लाच घेताना येथील जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयातील विशेष लेखा परीक्षक (वर्ग 2) किसन दिगंबर सागर (वय 55 रा. सातारा परिसर, जि. छत्रपती संभाजीनगर) व खासगी लेखा परीक्षक तय्यब वजीर पठाण (वय 48 रा. जळके खुर्द ता. नेवासा) यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी नेवासा फाटा येथील बाळूमामा ज्युस सेंटर येथे ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पोलीस अंमलदार हरूण शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने सदरची कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा खुर्द येथील एका पतसंस्थेचे लेखापरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी लेखापरीक्षक सागर यांना दिले होते. त्यांनी पतसंस्थेचे चेअरमन व त्यांचे नातेवाईक यांचा नावावरील मुदत ठेवींची रक्कम व्याजासह अहवालात दर्शविणेसाठी व लेखापरीक्षण अहवाल चांगला सादर करण्यासाठी तीन लाखांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार चेअरमन यांनी लाचलुचपत विभागाकडे केली होती.

लाचलुचपत विभागाने 17 मार्च, 2023 रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच पडताळणीमध्ये लोकसेवक यांनी तक्रारदार यांचाकडे तडजोडअंती दोन लाखाची मागणी खासगी लेखा परीक्षक पठाण याच्या उपस्थितीत केली. मागणी दरम्यान पठाण याने प्रोत्साहन दिले. तक्रारदार यांनी मागणी केलेल्या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात एक लाख रूपये देण्याची विनंती केली व सदर लाच रक्कम सोमवारी (दिनांक 20 मार्च) बाळूमामा ज्युस सेंटर, नेवासा फाटा येथे पंचासमक्ष स्विकारली असता विशेष लेखापरीक्षक सागर व खासगी लेखा परीक्षक पठाण यांना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Web Title: Special Auditor was caught red-handed while accepting a bribe

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here