Home संगमनेर संगमनेर तालुक्यात दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

संगमनेर तालुक्यात दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

Sangamner News: संगमनेर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आली आहे.

Accidental death of two youths in Sangamner taluka

संगमनेर: तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच असून, रविवारी तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन तरुणांचा बळी गेला. पहिल्या घटनेत रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या कडेला धडक बसल्याने दुचाकीवरून उडून पाण्यात पडल्याने २६ वर्षीय तरुणाचा तर दुसऱ्या घटनेत पाण्याचा कॉक सुरू करण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय कोवळ्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.

याबाबतची माहिती अशी, पहिली घटना रविवारी पहाटे दीडच्या सुमारास तालुक्यातील चंदनापुरी येथे घडली. रवींद्र शिवाजी रहाणे हा २६ वर्षीय तरुण दुचाकीवरून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या कठड्याला त्याच्या वाहनाची धडक बसल्यामुळे तो दुचाकीवरून उडून विहिरीत पडला व पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. मृत रवींद्र एका लग्न सोहळ्याला उपस्थित राहून घरी निघाला होता. मात्र घरी पोहोचण्यापूर्वीच त्याचा अपघाती मृत्यू झाला.

दुसरी घटना तालुक्यातील मिर्झापूर येथे घडली. १९ वर्षाच्या ऋषिकेश राधाकिसन वलवे या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू वाजण्याच्या सुमारास ऋषिकेशला झाला. सकाळी साडेसात वडिलांनी पाण्याचा कॉक सुरू करण्यासाठी शेततळ्यावर पाठवले होते. मात्र कॉक सुरू करताना त्याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात घसरत गेला व प्राण्यात पडला. त्याचा आरडाओरडा त्याच्या वडिलांच्या कानापर्यंत पोहोचू शकला नाही. शेततळ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने दमछाक झालेला ऋषिकेश पाण्यात बुडून मरण पावला. झाला. तो एकुलता एक आहे. तसेच तालुक्यातील वाघापूर येथील मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे गोरक्षनाथ साहेबराव जाधव यांचे अकाली निधन झाले. तीन तरूणांच्या निधनाने तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Web Title: Accidental death of two youths in Sangamner taluka

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here