संगमनेर: दुधाचा टँकरला दुचाकी धडकून भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
Sangamner Accident: प्रभात डेअरीचे दूध गोळा करून टँकर हा भरधाव वेगाने संगमनेरकडे येत होता यावेळी हा अपघात घडला.
संगमनेर: संगमनेर अकोले रोडवर चार तरुण दोन मोटारसायकल वर गप्पा मारीत चालत असताना मंगळापूर शिवारात भरधाव टँकरला समोरासमोर धडक दिल्याने भीषण अपघात घडला. प्रभात डेअरीचे दूध गोळा करून टँकर हा भरधाव वेगाने संगमनेरकडे येत होता यावेळी हा अपघात घडला. मंगळवारी रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात ऋषिकेश उमाजी हासे (वय 20), सुयोग बाळासाहेब हासे (वय 21) आणि नितेश बाळासाहेब सिनारे (वय 26, तिघेही रा. चिखली, ता. संगमनेर, जि. अ. नगर) अशी मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर संदीप भाऊसाहेब केरे (वय 32, रा. चिखली) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
गंभीर झालेल्या तरुणाला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. या दुर्दैवी घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Three killed in a horrific accident after a two-wheeler hit a milk tanker
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App