धक्कादायक! दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या
Crime News : दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार.
पालघर: दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे. दहा वर्षीय अल्पवयीन मुलीचे शाळेत जात असताना अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. अत्याचारानंतर चिमुकलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपीला तलासरी पोलिसांनी अवघ्यात दोन तासांच्या आत अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तलासरीतील डोंगारी येथील दहा वर्षीय चिमुकली शाळेत जात असताना स्कुटी वरून तिचं एका 45 वर्षीय आरोपीने अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर या चिमुकलीची हत्या करून तिचा मृतदेह संजान भिलाड मार्गालगत एका जंगलात फेकून देण्यात आला होता. तलासरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच चार पथकांकडून या चिमुकलीचा शोध सुरु करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी संशयावरुन एकाला ताब्यात घेण्यात आल असून चौकशी केली.
चौकशीअंती आरोपीने आपणच हे कृत्य केल्याची कबुली दिली. पीडित चिमुकलीचे आजोबा आणि आरोपी यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद असून त्याच्यातून आरोपीने हे कृत्य केल्याचे आरोपीने पोलीस तपासात सांगितले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात भादवि कलम 302 , 376 , पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तलासरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Web Title: ten-year-old girl was abused and Murder
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App