Suicide: बारावीतील विद्यार्थीनीची आत्महत्या
मोरेवाडीत बारावीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
कोल्हापूर: शहराला लागून असलेल्या मोरेवाडीत बारावीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना घडली. मोरेवाडी परिसरातील कोरेनगरमधील लीया अमित रुकडीकर (वय 18) हिने आज घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वडिलांनी फोन केल्यानंतर लीयाने तब्येत बरं वाटत नसल्याचे सांगितले. आई वृषाली शिक्षिका असल्याने शाळेत गेल्या होत्या. तिच्यासोबत घरी फक्त आजी होती. झोपायला जाते म्हणून सांगून लीया बेडरूममध्ये गेली होती. दुपारी दीडच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर औषधे घेण्यासाठी तिला बोलविले. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वडिलांनी दरवाजा ढकलून कडी तोडून खोलीत प्रवेश केला असता त्यांना मोठा धक्का बसला.
तिच्या मागे आई, वडील, बहीण व आजी असा परिवार आहे. ती बारावीची परीक्षा देत होती. आत्महत्या मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. करवीर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Suicide of a 12th student
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App