अहमदनगर: व्हिडियो कॉल करून महिलेचा विनयभंग
Ahmednagar Crime: सोशियल मेडीयावरून महिलेचा विनयभंग (molested) केल्याची घटना समोर आली आहे. सोशियल मेडीयावरून महिलेला व्हिडियो कॉल करून अश्लील संवाद साधणाऱ्या एका अनोळखी इसामाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर: सावेडी उपनगरातील एका तरुणीला तिच्या फेसबूक अकाऊंटवर एका व्यक्तीने महिलेच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत त्यावर व्हिडिओ कॉलिंग करून गैरवर्तन केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 फेब्रुवारीला तरुणीच्या फेसबुकवर एका महिलेच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. 24 फेब्रुवारीला तिने ती स्वीकारली. त्यानंतर 25 फेब्रुवारीला दुपारी त्या अकाऊंटवरुन मेसेज आला. तरुणीने तिला रिप्लाय केल्यावर समोरील व्यक्तीने व्हीडीओ कॉल केला. चेहरा अस्पष्ट ठेवत एका अज्ञात पुरुषाने तिच्याशी अश्लिल संभाषण करत गैरवर्तन केले. जिवे ठार मारुन टाकील, अशी धमकी दिली. त्यानंतरही वारंवार कॉल व मेसेज केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Web Title: Ahmednagar Woman molested by video call
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App