Home क्राईम धक्कादायक!  महिला नायब तहसीलदार यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

धक्कादायक!  महिला नायब तहसीलदार यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

Beed Crime News : केज येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा (Burn) प्रयत्न करण्यात आला. सरकारी अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ.

an attempt was made to burn a woman Naib Tehsildar by pouring petrol on her

बीड:  बीड जिल्ह्यातील केजमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यामुळे केजमध्ये या प्रकरणाची चर्चा होत आहे. केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली आहे. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आशा वाघ यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नायब तहसीलदार आशा वाघ आज दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे मोपेडवरून येत होत्या. त्याचवेळी एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बॉटलमधील पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत. केज येथील सरकारी रुग्णालयात आशा वाघ यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस या घटनेचा तपास घेत आहेत. हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

कौटुंबिक वादातून आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानेच त्यांच्यावर हल्ला केला होता.

Web Title: an attempt was made to burn a woman Naib Tehsildar by pouring petrol on her

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here