संगमनेर मधील घटना: पोलीस असल्याचे सांगून टेम्पो लांबविला
Ahmednagar | Sangamner Crime: पोलीस असल्याची बतावणी करत टेम्पो लांबवल्याने संगमनेरमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर.
संगमनेर: काळ्या फिल्म लावलेल्या मारुती कारमधून आलेल्या चौघांनी पोलीस असल्याचे सांगून रोखरकमेसह टेम्पो लांबविण्याची घटना शहरालगतच्या नाशिक-पुणे बाह्यवळण मार्गावर घडली आहे. थेट पोलीस असल्याची बतावणी करत टेम्पो लांबवल्याने संगमनेरमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. या संदर्भात मुंबई येथील शामू रज्जू गौड याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेम्पोचालक गौड हा १२ जानेवारीला पुणे येथून टेम्पोमध्ये टिश्यू पेपरचा माल घेऊन नाशिक येथे जात होता. संगमनेरच्या हिवरगावपावसा टोलनाक्यावर विश्रांती घेऊन तो नाशिकच्या दिशेने सायंकाळी मार्गस्थ झाला होता. बाह्यवळण रस्त्यावर मालपाणी तंबाखू कारखान्याजवळ काळ्या काचा असलेल्या पिवळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या मारुती ८०० कारमधून आलेल्या व्यक्तींनी त्याला टेम्पो थांबविण्यास भाग पाडले.
टेम्पोचालकाने एका चहाच्या टपरीजवळ टेम्पो थांबविला असता, खाली उतरलेल्या चौघांनी आपण पोलीस असल्याचे त्याला सांगितले टेम्पोमध्ये गांजा असल्याचे सांगत टेम्पोची तपासणी करावयाची आहे असे सांगत टेम्पोची कागदपत्रे दाखवण्यास सांगितले.
त्यातील एकाच्या हातात पोलिसांची काठी असल्याने ते पोलीसच असावेत, असे टेम्पोचालक गौड याला वाटले हातातील काठीने टेम्पोच्या दरवाजावर मारले, त्यामुळे दरवाजाची काचदेखील फुटली पोलीस असलेल्यांनी गोड आणि त्याच्या साथीदाराला त्यांच्या कारमध्ये बसविले त्यातील एकाने तुम्ही पोलीस स्टेशनला या आम्ही टेम्पो घेऊन पुढे जातो’, असे सांगितले.
कारचालकाने दहा ते बारा किलोमीटरपुढे नाशिकच्या दिशेने कार नेऊन दोघांना खाली उतरवून दिले. तुम्ही येथे थांबा, तुमची गाडी थोड्या वेळात आणून देतो’, असे सांगून तो तेथून निघून गेला. टेम्पो आणि पोलीस रात्रभर न परतल्याने परिसरात टेम्पोचा शोध घेऊन गोड आणि त्याचा साथीदार दोघे पोलीस स्टेशनला आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात टेम्पोसह त्यातील दोन मोबाईल ३० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची तक्रार दाखल केली. उपनिरीक्षक निकिता महाले तपास करत आहेत.
Web Title: Saying that it was the police, the tempo was extended crime Filed
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App