Home जळगाव वर्षाचा पहिलाच सूर्योदय अन्‌ घरचा दिवा विझला,  प्रेमप्रकरणातूनच टोकाचे पाऊल?

वर्षाचा पहिलाच सूर्योदय अन्‌ घरचा दिवा विझला,  प्रेमप्रकरणातूनच टोकाचे पाऊल?

Suicide News: वर्षाचा पहिला दिवस उजाडल्यावर मुलाला उठवायला खोलीत गेलेल्या आईला गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलगा दिसताच तिने एकच हंबराडा फोडत आक्रोश, राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या.

Young son attempt suicide in starting of new year suicide behind reason is love matter jalgaon news

जळगाव : शहरातील तांबापुरा भिलाटी परिसरातील १९ वर्षीय तरुणाने मध्यरात्रीनंतर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. रविवारी (ता. १) वर्षाचा पहिला दिवस उजाडल्यावर मुलाला उठवायला खोलीत गेलेल्या आईला गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलगा दिसताच तिने एकच हंबराडा फोडत आक्रोश केला.

मनोहर कैलास गायकवाड (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

मनोहर कैलास गायकवाड तांबापुरा परिसरात आई-वडील आणि लहान भावासोबत वास्तव्याला होता. मिळेल ते काम करून तो कुटुंबाला हातभार लावत होता. ३१ डिसेंबरला रात्री अकराला मनोहर जेवण करून घराच्या मागच्या खोलीत झोपायला गेला. मध्यरात्री त्याने दोरीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. रविवारी (ता. १) सकाळी आठपूर्वी आई राधाबाई मनोहरला उठविण्यासाठी हाका मारत होत्या. तो प्रतिसाद देत नसल्याने त्या खोलीत गेल्या. तेथे लटकलेल्या अवस्थेत मनोहरचा मृतदेह पाहून राधाबाई यांनी आक्रोश करत हंबरडा फोडला.

त्यांच्या आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. तत्काळ घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात नेला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक नितीन पाटील, तुषार गिरासे तपास करीत आहेत.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

दरम्यान, मनोहर गायकवाड काही दिवसांपासून एमआयडीसीतील एका कारखान्यातही रोजंदारीवर जात होता. व्हॉटस्‌ॲप-फेसबुकवर नवे स्टाईलीश फोटो टाकून कमेंट मिळवणे, मित्रांच्या चर्चेत राहायला त्याला आवडत असे. नेहमी आनंदी, उत्साही असणारा मन्या सहजासहजी, असे पाऊल उचलणारच नाही, असा त्याच्या ओळखीच्या तरुणांना विश्वास आहे. प्रेमप्रकरणातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे,  असाही संशय व्यक्त होत आहे.

Web Title: Young son attempt suicide in starting of new year suicide behind reason is love matter jalgaon news

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here