Home अकोले अजित दादा नगरमध्ये मोठा नेता गळाला लावत विरोधकांना देणार मोठा धक्का

अजित दादा नगरमध्ये मोठा नेता गळाला लावत विरोधकांना देणार मोठा धक्का

Ajit Pawar: युवानेते मारुती मेंगाळ (Maruti Mengal) यांचा राष्ट्रवादी प्रवेशाची अकोले तालुक्यात जोरदार चर्चा, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी दोन ते तीन बैठका या संदर्भात पार पडल्या असुन जवळजवळ हा प्रवेश निश्चित मानला जात आहे.

Ajit Pawar will give a big blow to the opposition by strangling

अकोले: आदिवासी युवानेते मारुती मेंगाळ यांचा राष्ट्रवादी प्रवेशाची अकोले तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. आदिवासी समाजाचे युवानेते तथा माजी सभापती मारुती मेंगाळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे.

मारुती मेंगाळ यांच्या अलीकडेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी दोन ते तीन बैठका या संदर्भात पार  पडल्या असुन जवळजवळ हा प्रवेश निश्चित मानला जात आहे. मेंगाळ हे ठाकर समाजाचेयुवानेते असुन त्यांनी ठाकर समाजात  युवा व जेष्ठ वर्गाचे संघटन मोठ्या प्रमाणात केले आहे.

सध्या मेंगाळ हे शिवसेनेमध्ये आहेत. ते अकोले पंचायत समितीचे उपसभापती होते. त्यांनी आपल्या उपसभापती पदाच्या कार्यकालात अकोलेमध्ये मोठ्या प्रमाणात कामे कली. अत्याचारग्रस्त कुटुंब, सामाजिक प्रश्नांसाठी मेंगाळ यांनी आक्रमक आंदोलने केली आहेत. मेंगाळ यांचे सर्वपक्षीय नेते मंडळीशी सुसंवाद आहे. अकोले तालुक्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

अकोले तालुक्यातील जिल्हा व तालुक्यातील बहुजन नेत्याने हा प्रवेश व्हावा म्हणून प्रयत्न केले. पक्षाला ठाकर समाजातील मोठ्या युवानेत्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मताचे कसे विभाजन होते, हे पवार यांना पटवून दिल्याची माहीत आहे. पवार नेहमी बेरजेचे राजकारण करत असतात. अजित पवार यांनी ही अकोले तालुक्यातील भविष्यातील राजकारणात मत विभाजन टाळण्यासाठी सर्व शक्ती एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

या प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेरचे आमदार निलेश लंके, जुन्नरचे आमदार अतुल बेणके, आमदार दरोडा हे अनेक दिवसांपासून मेंगाळ यांच्या संपर्कात होते, अशीही माहिती आहे. आमदार डॉ. किरण लहामटे, जेष्ठ नेते अशोकराव भांगरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मेंगाळ यांच्या पक्ष प्रवेशामुळे मोठी ताकद अकोले तालुक्यात मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. भविष्यत विधानसभा, जिल्हा परीषद, पंचायत समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

त्यातच अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सोडत ही आदिवासी व्यक्ती राखीव झाल्यामुळे मेंगाळ यांचा पक्ष प्रवेश करुन घेत त्यांना या पदासाठी निश्चित केले जाऊ शकते. व एकीकडे आमदार मोहदयांना त्यांचा मार्ग मोकळा करुन दिला जाऊ शकतो. तर अगस्ती सहकारी साखर कारखाना जेष्ठ नेते अशोकराव भांगरे यांच्या नेतृत्वात चालवला जाऊ शकतो, असा कायास राजकीय जाणकारांकडून वर्तवला जात आहे.

Web Title: Ajit Pawar will give a big blow to the opposition by strangling

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here