Home अहमदनगर अहमदनगरमधील घटना, इन्स्टाग्रामवरील प्रेमात धोका-  Instagram Love

अहमदनगरमधील घटना, इन्स्टाग्रामवरील प्रेमात धोका-  Instagram Love

Ahmednagar Instagram Love:  पीएसआय असल्याचे भासवून तरुणीसोबत लग्न, तो एका खासगी कंपनीत कामाला, फसवणुकीचा गुन्हा दाखल.

Ahmednagar Instagram Love fraud

अहमदनगर : पीएसआय असल्याचे भासवून तरुणीसह तिच्या घरच्यांचा विश्‍वास संपादन करीत लग्न केले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

इन्स्टाग्रामवर या दोघांची ओळख झाली होती. सावेडी उपनगरात राहणाऱ्या पीडित तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. एप्रिल २०१९ मध्ये इन्स्टाग्रामवर किरण मुरलीधर घुटे (रा. पुणे, मूळ रा. देवळे, ता. जुन्नर, जि. पुणे) याची तरुणीशी ओळख झाली. किरणने तरुणीच्या आई-वडिलांना, पीएसआय असल्याचे सांगितले होते.

त्यांनी २ फेब्रुवारी २०२१ रोजी मुलीचा विवाह किरणसोबत लावून दिला. विवाहानंतर किरण पीएसआयचे ट्रेनिंग असल्याचे सांगून निघून गेला. तो दोन महिन्यांतून एकदा तिला भेटण्यासाठी येत होता. तो येथे घरी आल्यानंतर तरुणीचा मानसिक छळ करत.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

तरुणीच्या वडिलांनी किरणच्या वडिलांना लग्न झाल्याची माहिती दिली तेव्हा, त्यांनी तो पीएसआय नसून, पुण्यात खासगी कंपनीत काम करत असल्याचे सांगितले.

Web Title: Ahmednagar Instagram Love fraud

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here