धक्कादायक: तरुणाने स्वतःचे सरण रचून (चिता) पेटवून आत्महत्या, चिट्ठीमध्ये मेसेज
Ahmednagar Nevasa Suicide: स्वतःचे सरण रचून त्यावर स्वतःला बांधून पेटवून घेत आत्महत्या.
नेवासा: नेवासा तालुक्यातील चांद्यापासून जवळच असलेल्या लोहारवाडी शिवारात 27 वर्षीय तरुणाने स्वतःच स्वतःचे सरण (चिता) रचून त्यावर स्वतःला बांधून घेवून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील चांद्या जवळील लोहारवाडी शिवारात विरळ वस्ती असलेल्या भागातील गट नं. 41 मधील वस्तीवर राहत असलेले साहेबराव पुंड यांचा मुलगा अनिल साहेबराव पुंड (वय 27) याने मध्यरात्रीच्या सुमारास घरापासून काही अंतरावर शेतातील लाकडे जमा करुन स्वतःची चिता (सरण) रचली. त्यावर शेतातील ठिबक सिंचन संचाच्या नळ्या गोळा करुन त्या अंथरल्या.
दरम्यान श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके रांनी घटनास्थळी भेट देवून तपासाबाबत मार्गदर्शन केले. शनिवारी रात्री 1.30 वाजता मरत अनिल पुंड याने आपल्रा मोबाईलवरुन बहीण व मावशीला आत्महत्या करणार असल्याचा मेसेज पाठविला होता. चिठ्ठी लिहून ठेवली असली तरी या आत्महत्येबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित होत आहेत. आत्महत्येच्या या घटनेने चांदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अनिल पुंड याने लिहून ठेवलेल्या आत्महत्या चिठ्ठीमध्ये (suicide note) माझ्या मरणाला मी स्वतःच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. मध्यरात्री त्याने बहिण व मावशीला आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविला. आत्महत्या चिठ्ठीत मोबाईल लॉक कसा उघडायचा हेही लिहून ठेवले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.
Web Title: A young man commits suicide by burning his pyre
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App