बहिणीकडे गेलेल्या भावाची भाऊबीज ठरली अखेरची
नदीपात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून (Drowned) १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना, भाऊबीज सणासाठी बहिणीकडे गेला होता.
जळगाव: भाऊबीजेचा पवित्र सण साजरा करण्यासाठी आपल्या लाडक्या बहिणीचे आशिर्वाद घेण्यासाठी गेलेल्या पाचोरा येथील 17 वर्षीय युवकाचा वालझिरी येथील नदीपात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामुळे चौधरी कुटुंबियावर काळाने घाला घातला आहे.
पाचोरा शहरातील श्रीराम नगरातील रहिवाशी राहुल सुरेश चौधरी (वय 17) हा युवक 27 ऑक्टोंबरला भाऊबीजेसाठी बहिणीकडे गेला होता. बहिणीचे आशिर्वाद घेत मोठ्या उत्साहात भाऊबीज सण साजरा करण्यात आला. दरम्यान त्याच दिवशी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राहुल हा वालझिरी (चाळीसगाव) येथे आयोजित नवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. दरम्यान नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता राहुल याचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला.
सदरचा प्रकार त्याच्या सोबत असलेल्या चिमुकल्यांनी परिवारातील सदस्यांना सांगितला. यानंतर तात्काळ उपस्थितांच्या मदतीने राहुल यास पाण्यातुन बाहेर काढत लागलीच चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी राहुल यास मृत घोषित करताच कुटुबिंयांनी एकच हंबरडा फोडला. मयत राहुल चौधरी याचे पाश्चात्य वृद्ध आई, बहिण, पाहुणे असा परिवार असुन राहुल चौधरी याचे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचा राहुल याचे दुर्दैवी मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.
Web Title: Drowned brother death who went to the sister was the last
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App