Home अकोले बनावट खत विक्रीप्रकरणी कृषी सेवा केंद्र चालकावर अकोलेत गुन्हा दाखल

बनावट खत विक्रीप्रकरणी कृषी सेवा केंद्र चालकावर अकोलेत गुन्हा दाखल

Akole Crime: कृषी सेवा केंद्रातून बनावट खत शेतकऱ्याला विक्री केल्याप्रकरणी दुकानमालक  याच्यावर गुन्हा दाखल.

agricultural service center in Akole in connection with the sale of fake fertilizer 

अकोले: तालुक्यातील लिंगदेव येथील आर्द्रता ऍग्रो फार्मस इंडिया या नावाच्या कृषी सेवा केंद्रातून बनावट खत शेतकऱ्याला विक्री केल्याप्रकरणी दुकानमालक आशुतोष ठका शेटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र अकोले शहरासह तालुक्यातील ही अनेक दुकानांमधून बनावट खते व औषधांची विक्री सुरू आहे.कृषी विभाग व कृषी सेवा केंद्र चालकांच्या साट्यालोट्यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी बनावट खते व औषधांना बळी पडत आहे.जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी अकोले तालुक्यातील विक्रेत्यांच्या दुकानांची झाडाझडती घेतल्यास बनावट साठा पुरवठा करणारे मोठे रॅकेट उघडकीस येईल.   

अकोले तालुक्यातील लिगदेव येथील आशुतोष ठका शेटे यांच्या आर्द्रता अँग्रो फार्मस इंडिया पि.व्ही.लि. या खताच्या दुकानात खत शेतकरी सोमनाथ अंकुश चौधरी यांनी घेतले असता त्यांना शंका आली. व ते १०,२६,२६  सारखे दिसत नसुन ते बनावट असल्यासारखे वाटते तरी तुम्ही येवून खात्री करा असे शेतकऱ्यांने सांगितल्याने आम्ही तुमच्याकडे येतो तोपर्यंत तुम्ही ती बनावट खताची बर्ग तसीच ठेवुन द्या असे कळवले.तर  रविवार दि.१६ रोजी मी कंपनी प्रतिनिदी शेळके तालुका कृ अधिकारी माधव हासे,  शेतकरी सोमनाथ अंकुश चौधरी यांचे घरी गेलो तेव्हा शेतकरी सोमनाथ चौधरी यांनी त्यांचे जवळ असलेली खताची गोणी दाखवीली आम्ही ती पाहीली असता तिचे आत मधे १०,२६,२६ खताच्या एवजे त्याचेच बनावट खत असल्याची शंका आली म्हणुन आम्ही शेतकरी सोमनाथ चौधरी यांना सदर खताचे बिलाची मागणी केली त्यावेळी त्यांनी आर्द्रतो अँग्रो फार्मस इंडिया पि.व्ही.टी. लि. यांचे बिल दाखवले त्या बिलावर  १०,२६,२६ या खताचे पुढील पक्या बिलावर नोंद न करता पाठिमागे पेनने लिहिलेले होते म्हणुन आम्ही लागलीच सदर दुकानदार आशुतोष ठका शेटे रा. लिंगदेव ता. अकोले यांना सदर शेतकरी सोमनाथ चौधरी यांचे घरी बोलावुन घेतले त्यावेळी सदर दुकानदार शेतकरी सोमनाथ चौधरी यांचे घरी आल्यानंतर त्यांचेकडे सदर खता बाबत विचारपुस केली असता उडवा उडवीचे उत्तर हेतु लागले म्हणुन आम्हाला शंका आल्याने आम्ही लागलीच सदर खताचे गोणीचा पंचनामा केला तिचे वर्णन खालील प्रमाणे बाह्य आवरणावर जय किसान समर्थ खताची गोण मिळुन आली यि गोणी मध्ये अंदाजे २५ किलो खत शिल्लक असल्याने आम्ही सदर खतामधुन अंदाजे ४०० ग्रॅम वजणाची तपासणी करता उसॅम्पल वेगवेगळे काढुन जाग्यावरच सिल करुन सदर खताची गोण व २ शम्पल आमच्या ताब्यात घेवुन १ सॅम्पल  शेतकरील सोमनाथ चौधरी यांना देवुन तसा सविस्तर पंचनामा केला. तसेच खताची तपासणी होण्यासाठी घेतलेले सॅम्पल पुणे येथील प्रयोग शाळेत पोस्टाने पाठवुन दिले व त्यानंतर सदर दुकानदार यांना सदर खाताचे बिलाचे बाबत विचारणा करण्याबाबत दुकाण तपासणी करुन दुकाणदारास नोटीस काढुन विचारणा केली परंतु त्यांनी आद्याप पावेतो सदर बिलाबाबत कुठलीही माहीती दिली नाही. म्हणुन मी सदर संशयीत बनावट खत पुरवणारे दुकाणदार आशुतोष ठका शेटे रा. लिंगदेव ता. अकोले यांचे विरुद्ध फिर्याद अकोले पं.समिती तालुका कृषी अधिकारी सचिन देवराम कोष्टी यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिली आहे.भा.द.वी कलम ४२०  सह खतः । नियंत्रण आदेश अधिनीयम १९८५ चे कलम २ (A) (B)(F), ५, १९, अत्यावश्यक वस्तु सेवा अधिनीयम चे कलम ३(२)(D), ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे करीत आहेत.                                                                                                  लिंगदेव येथील कृषी सेवा केंद्रातून बनावट खत शेतकऱ्यांना देण्यात आल्याने कृषी विभागाने कारवाई केली. परंतु बोगस, खत बियाणे विकणाऱ्यांवर तात्पुरती कारवाई करून प्रकरण बासनात गुंडाळले जाते. यापुढील काळात शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बनावट खत व औषध कंपन्यावर कडक करणे गरजेचे आहे. तर बनावट खत,औषधे दुकान बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे. – सुरेश नवले शेतकरी पुत्र.                                                                 

लिंगदेव येथील आर्द्रता ऍग्रो फार्मस इंडिया या नावाच्या कृषी सेवा केंद्रात बोगस खताचे प्रकरण आढळून आल्याने त्या संदर्भात बनावट खत उपलब्ध करून घेऊन कृषी सेवा केंद्र मार्फत विक्री करताना चौकशी वरुन आढळून आल्याने रासायनिक खत आदेश १९८५ तर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राकडून फसवणूक झाल्यास कारवाई करण्यात येईल. तसेचं बनावट खते,बियाणे विक्री करणाऱ्या बाबत शेतकऱ्यांनी संपर्क साधावे असे आव्हान जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक किरण मांगडे यांनी केले आहे.

Web Title: agricultural service center in Akole in connection with the sale of fake fertilizer 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here