Home अहमदनगर प्रवरा नदीत उडी घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

प्रवरा नदीत उडी घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

Shrirampur Pravara river Dead Body Found:  तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर या शेतकऱ्याचा मृतदेह मालुंजा शिवारातील नदीपात्रात मृतदेह सापडला.

Dead body of a farmer who jumped into Pravara river was found

श्रीरामपूर: बेलापूर येथील पुलावरून प्रवरा नदीपात्रात उडी घेतल्याची घटना घडली होती. तेव्हापासून शोधकार्य सुरु होते. नदीला पाणी असल्यामुळे सापडू शकत नव्हता. मात्र तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर या शेतकऱ्याचा मृतदेह मालुंजा शिवारातील नदीपात्रात सापडला आहे. राजेंद्र तुकाराम बारहाते असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दि. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास बेलापूर खुर्द येथील राजेंद्र तुकाराम बारहाते या शेतकर्‍याने नदीच्या पुलाच्या कठड्यावर येवून उभे राहून प्रवरा नदीत उडी मारली होती. बेलापूर पोलिसानी स्थानिक ग्रामस्थ व पोहणार्‍यांच्या मदतीने दोन दिवस शोध घेतला पण उपयोग झाला नाही. त्यातच पाऊसही वाढला आणि नदीच्या पाण्याचा प्रवाहही वाढल्याने कदाचित मृतदेह वाहत खाली गेला असावा, अशी शक्यता होती.

मात्र काल दुपारच्या दरम्यान मालुंजाच्या काही नागरिकांना एक मृतदेह नदीपात्रात वाहत येत असताना दिसला. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती पोलीस पाटील यांना दिली. त्यानंतर तातडीने श्रीरामपूर तालुका पोलिसांना पाचारण करुन तो मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढला. त्यानंतर तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजेंद्र बारहाते हे आजारी असल्यामुळे चेहर्‍यावर चिंताग्रस्त दिसत होते. त्यामुळे त्यांनी वैतागुन प्रवरा नदीपात्रात उडी मारली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

Web Title: Dead body of a farmer who jumped into Pravara river was found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here