Home अहमदनगर शाळकरी मुलीचा विनयभंग, शाळेतून घरी येत असताना…

शाळकरी मुलीचा विनयभंग, शाळेतून घरी येत असताना…

Ahmednagar | Shrirampur Crime: अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढून तिचा विनयभंग (Molested) केल्याची घटना.

School girl molested

श्रीरामपूर: तालुक्यातील निपाणीवडगाव येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 1 ऑक्टोबरपासून ते दि. 15 ऑक्टोबरदरम्यान अल्पवयीन मुलगी शाळेत असताना व शाळेतून घराकडे येत असताना आसिफ नावाच्या तरुणाने त्या मुलीला तू मला फार आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. असे म्हणून व तिला चॉकलेटचे आमीष दाखवून तिची छेड काढायचा. तसेच दि. 5 ऑक्टोबर रोजी सायं. 7.30 वाजता अल्पवयीन मुलीच्या घरासमोर येऊन मुलीला प्रपोज करून पळून गेला. त्यानंतर घराच्या पाठीमागे येऊन मुलीला बाहेर बोलावण्यासाठी आमच्या घराचे पत्रे वाजवून मुलीला घराबाहेर येण्यास धमकावले. याबाबत त्याला विचारपूस केली असता त्याने मुलीच्या वडिलांचा हात पिरगाळून त्यांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आसिफ नवाब शहा, रा.निपाणीवडगाव, ता. श्रीरामपूर तसेच त्याचा चुलता व दोन भावांचे नाव माहीत नाही यांच्याविरोधात भादंवि कलम 354, 354(ड) सह बाललैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे करीत आहेत.

Web Title: School girl molested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here