Home महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

Crime Vidya Chavan: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल.

Crime has been registered against senior NCP leader Vidya Chavan

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीनुसार चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चव्हाण यांनी मोहित कंबोज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात आक्रमक वक्तव्य केलं होतं. मोहित कंबोज ठग असून तो भारतीय जनता पक्षाचा मनी सप्लायर आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला होता.

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी कंबोज यांच्यावर शाब्दिक हल्ला केला होता. मोहित कंबोज ठग असून तो भारतीय जनता पक्षाचा मनी सप्लायर आहे, त्यानं मला ‘जय श्रीराम’केलंय तर मी देखील त्याला ‘हर हर महादेव, जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली,जय सियाराम’ असं म्हणत उत्तर दिलं होतं, असं विधान चव्हाण यांनी केल्यावर राजकीय वातावरणात खळबळ उडाली होती.

आम्ही प्रभू रामचंद्रांच्या आधी सितामय्याचं नाव घेतो, कारण आम्ही सच्चे हिंदू आहोत, आमचं हिंदुत्व ढोंगी नाही, त्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे,असं म्हणत विद्या चव्हाण यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर पलटवार केला होता. त्यानंतर आता विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime has been registered against senior NCP leader Vidya Chavan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here