Accident: कंटेनरने डम्परला धडक दिल्याने भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
Ahmednagar | Nevasa Accident: वडाळा बहिरोबा गावाजवळील घटना : कंटेनर – डम्परची धडक.
नेवासा फाटा: नगर- औरंगाबाद maharaमहामार्गावर वडाळा बहिरोबा जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डम्परला कंटेनरने मागील बाजूने धडक दिली. या अपघातात दोन मजुरांसह कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. चौघे जखमी झाले.
ही घटना ते दहा मजूर वडाळा (बहिरोबा) जवळ शनिवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावर दुभाजकामधील गवत काढण्याचे काम करीत होते. तेथेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा डम्पर उभा होता. दुपारच्या सुमारास औरंगाबादवरून नगरकडे जात असलेल्या कंटेनरने रस्त्यावर लावलेले बॅरिकेट ओलांडून मजुरांना उडवत डम्परला धडक दिली.
रमेश भगवान माने (वय ५०, रा. महामार्गावर वडाळा बहिरोबा (ता. बाभूळखेडा), हृषीकेश संजय निकम नेवासा) जवळ सार्वजनिक बांधकाम (वय २५, रा. सलाबतपूर, ता. नेवासा), विभागाच्या डम्परला कंटेनरने मागील कंटनेर चालक दादासाहेब खराडे अशी मृतांची नावे मजुरांसह कंटेनर चालकाचा मृत्यू आहेत
यावेळी रमेश भगवान माने, हृषीकेश संजय व कंटेनर चालक दादासाहेब खराडे यांचा मृत्यू झाला. या अपघातात भैय्या निकम, मेहबूब इब्राहिम शेख, संभाजी आसाराम वायकर, बाळासाहेब रघुनाथ पाटेकर हे जखमी झाले. जखमींना नेवासा फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत रात्री उशीरापर्यंत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Web Title: Three killed in a horrific accident after a container hit a dumper