Home अहमदनगर अहमदनगर: पोलीस निरिक्षक पोवारसह एकावर गुन्हा

अहमदनगर: पोलीस निरिक्षक पोवारसह एकावर गुन्हा

Newasa Crime News | कलम कमी करण्यासाठी घेतले पैसे, पोलीस निरिक्षक पोवारसह एकावर गुन्हा.

Crime against one including Police Inspector Powar

नेवासा : नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील कलम वगळण्यासाठी पैशांची मागणी केल्याप्रकरणी पोलीस निरिक्षकासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरिक्षकांना पूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.

याप्रकरणी सुनील गर्जे व पोलीस निरिक्षक बाजीराव पोवार, असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत जानकू रामभाऊ कोकरे (रा. राहुरी कॉलेजवळ, ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे. कोकरे व त्यांचे बंधू पांडूरंग हरिभाऊ कोकरे हे दोघे नातीच्या चौकशीसाठी नेवासा पोलीस ठाण्यात गेले होते. ही घटना १० मे २०२२ रोजी घडली होती. त्यावेळी पोलीस निरिक्षक पोवार यांच्या दालनात गर्जे बसलेला होता. पोलीस निरिक्षक पोवार यांनी कोकरे यांच्यावर दाखल झालेले गुन्ह्याचे कलम वाचवून दाखविले.

त्यावर कोकरे यांनी तुम्हीच काही तरी करा, असे ते पोवर यांना म्हणाले. त्यानंतर काहीवेळाने गर्जे हा कोकरे बंधूना बाहेर घेऊन आला व अडीच लाख रुपये लागतील, असे तो काकरे यांना म्हणाला. कोकरे बंधूशी चर्चा करून गर्जे हा पुन्हा पोलीस निरिक्षक पोवार यांच्याकडे केला. त्यांच्याशी चर्चा करून बाहेर आल्यानंतर ते काही ऐकत नाहीत. किमान दोन लाख तरी द्यावे लागतील, असे त्याने कोकरे यांना सांगितले. तडजोडअंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार कोकरे यांनी पतसंस्थेतून पैसे काढून गर्जे याच्याकडे दिले. दुसऱ्या दिवशी गर्जे याने कोकरे यांना फोन केला व दिलेले पैसे घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर कोकरे हे पैसे घेण्यासाठी गेले नाहीत. त्यामुळे गर्जे याने कोकरे यांच्या अंतरवाली येथील घरी येऊन सव्वा लाख रुपये परत केले, असे कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे

Web Title: Crime against one including Police Inspector Powar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here