राजुर: सर्वोदय विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
राजुर: सर्वोदय विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
राजुर: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही पद्धतीने राज्य करण्यासाठी, देशाला एक आदर्श व विकसनशील देश म्हणून भारताची ओळख करून देण्यासाठी रात्रदिवस लिखाण करून एक आदर्शवंत, दिशादर्शक, राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिली व त्याद्वारे आज आपला देश एक आदर्श लोकशाही पुरस्कर्ता ठरला आहे.
अकोले तालुक्यातील राजुर येथील गु. रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 128 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. मनोहर लेंडे व प्रमुख अतिथि अजय पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजनावेळी विद्यालयाचे उप प्राचार्य श्री. पर्बत एल.पी. पर्यवेक्षक नरसाळे एम.ए. सौ. सोनवणे व्ही. के. लोकवेध तालुका प्रतिंनिधि ललित मुतडक, श्री. अजित गुंजाळ, पगारे सर यांनी यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच इ. आठवीच्या विद्यार्थ्यानी व दिंडे सर , देशमुख के. व्ही. सर यांनी बुद्धवंदना,भीमस्मरण, भिंमस्तुतिसह गायन व पंचशीलेचे वाचन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथि श्री. अजय पवार सर लाभले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. नरसाळे एम. ए. होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सोनवणे व्ही. के. तर सूत्रसंचालन श्री. साबळे आर. डी. यांनी केले. श्री. पगारे सर, सौ. सावंत मॅडम, व इतर शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार श्री. मालुंजकर सर यांनी मानले.
Website Title: Svm Rajur Celebrated by Babasaheb Ambedkar Jayanti