Home अहमदनगर जेष्ठ कामगार नेते सुरेश गवळी यांचे निधन

जेष्ठ कामगार नेते सुरेश गवळी यांचे निधन

Ahmedngar News: विचारांच्या विविध संघटनांचे नेतृत्व करत कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष.

Senior labor leader Suresh Gawli passed away

अहमदनगर: अहमदनगर कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश मारुती गवळी (वय ७४) यांचे सोमवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अमरधाममध्ये दुपारी येथील अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कामगार चळवळीतील नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथील मूळ रहिवासी असलेले सुरेश गवळी हे नगर शहरात स्थायिक होते. विद्यार्थीदशेपासून ति कामगार चळवळीत सक्रिय होते. अहमदनगर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते विद्यार्थी संघटनेत जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले होते. त्यानंतर लाल निशाण पक्षाशी त्यांचा संबंध आला. त्यानंतर त्यांनी डाव्या

विचारांच्या विविध संघटनांचे नेतृत्व करत कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. लाल निशाण पक्षात काम करत असताना त्यांचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी ते सोनिया गांधी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी जवळून संबंध आला. गवळी यांनी महापालिका कामगार, साखर कामगार, औद्योगिक कामगार, कोतवाल, जिल्हा परिषद कामगार, वन कामगार, काच पत्रा वेचणारे कामगार अशा अनेक संघटनांसाठी व्यापक काम केले. त्यांना कामगार कायद्यांचे सखोल ज्ञान होते. मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचे ते अभ्यासक होते. या विषयावर झालेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी अनेकदा सहभाग घेतला. लाल निशाण पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन झाल्यानंतरही गवळी यांचे कार्य सुरूच होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी असल्याने त्यांचे कामकाज बंद होते. मात्र ते संपर्कात असायचे, असे महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले.

Web Title: Senior labor leader Suresh Gawli passed away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here