Home अहमदनगर ट्रकचा अपघात झाल्यानंतर चालकाची गळफास घेऊन आत्महत्या- Suicide

ट्रकचा अपघात झाल्यानंतर चालकाची गळफास घेऊन आत्महत्या- Suicide

Driver commits suicide by strangulation after truck accident

Ahmednagar | पाथर्डी | Pathardi: तालुक्यातील माणिकदौंडी घाटात धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण ट्रक पलटून अपघात (Accident) झाल्यानंतर चालकाने आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. जवळच असलेल्या बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. योगेश तुकाराम कव्हळे असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे.  

याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरुवार (दि 9) रोजी (एम एस 09 बी सी 3982) क्रमांकची दहा चाकी ट्रक पुणे जिल्ह्यातील यवत वरून माणिकदौंडीच्या घाटातून पाथर्डीकडे येत असतांना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून धोकादायक वळणावर ट्रक पलटून सुमारे 20 ते 25 फूट खोल खड्ड्यात कोसळला.

गुरुवारी पहाटे एका झाडाला कुणतरी व्यक्ती लटकलेला असल्याचे निदर्शनात आले व बाजूला अपघातग्रस्त ट्रक पडलेला निदर्शनास आला अशी माहिती पोलिस नाईक निलेश म्हस्के, पोलीस कॉन्स्टेबल अतुल शेळके यांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Driver commits suicide by strangulation after truck accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here