Accident | राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात
पुणे | Pune: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला आहे. मुंबई एकस्प्रेस वेवर येथे आमदार जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
एसटी बस आणि त्यांची बीएमडब्लू कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहे. मात्र त्यांच्या बीएमडब्लू कारचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई एक्सप्रेस वे वर कारनं दिली एसटीला धडक, गाडीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप असल्याची माहिती. अपघातात कुठलीही जीवितहानी नाही
Web Title: MLA Sangram Jagtap Car Accident